आमच्याविषयी
आमच्या सहली

महाराष्ट्रामध्ये, पुण्यात आणि तेही मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे नारायण पेठेमध्ये असलेल्या वंडर हॉलिडेजची स्थापना सन २०१० मध्ये झाली. संस्था स्थापन होण्यापुर्वी बरीच वर्षे संस्थेचे प्रवर्तक या क्षेत्रामध्ये वैयक्तिक पातळीवर काम करतच होते. व्याप्ती वाढु लागल्याने वंडर हॉलिडेजची स्थापना झाली.

कंपनी भारतभर सर्व क्षेत्रांमध्ये, जसे की केरळ, तामिळनाडू, राजस्थान, कर्नाटक, गुजरात, उत्तरांचल, हिमाचल, जम्मु-काश्मिर, सिक्किम्-बंगाल अशा व इतर ठिकाणीही सेवा पुरवते. या सर्व ठिकाणी ग्रुप टुर्स व वैयक्तिक सोयीप्रमाणे पॅकेजेस सुद्धा पुरविली जातात. गरजेप्रमाणे नुसती हॉटेल्स किंवा वाहतुक व्यवस्था सुद्धा पुरविली जाते.

वंडर हॉलिडेजला अल्पावधीत मिळालेल्या यशाचे श्रेय कामाच्या पद्धतीमध्ये व ज्या उद्दीष्टांनी संस्था सुरु झाली त्यांना आहे असे प्रवर्तक श्री. दिलीप धोत्रे सांगतात. पुण्यासारख्या ठिकाणी वर्षानुवर्षे चालणार्‍या कित्येक उत्तमोत्तम प्रवासी संस्था आहेत. पण तरीही नव्या पिढीला नवे हवे असते. संस्थेचे उद्दिष्ट आहे की जुन्या आणि नव्या दोन्ही पिढयांना हवे आहे ते द्यायचे. त्यांचे म्हणणे आहे

"जुने ते सोने, नवे ते घ्यावे"

कदाचित याच मुळे संस्थेला अल्पावधीत भरघोस प्रतिसाद मिळाला आहे.

आजच्या धकाधकीच्या जीवन पद्धतीमध्ये सहल, विरंगुळा, करमणुक ह्या गोष्टी हव्याहव्याशा आणि गरजेच्या असुनही अप्राप्त आहेत. वैयक्तिक नियोजन करणे तितकेसे सोपे नसते. प्रत्येक व्यक्तीची गरज, वेळेची उपलब्धता आणि बजेट या गोष्टी जाणुन घेऊन त्याप्रमाणे पॅकेजेसची आखणी करणे, मार्गदर्शन करणे ही वंडर हॉलिडेजची कार्यपद्धती आहे. प्रवासाची सुरुवात भारतातुन कुठुनही करण्याची सोय आहे.

सहलीच्या संकल्पना अलिकडे बदलु लागल्या आहेत. भ्रमंतीबरोबरच विरंगुळा, अद्ययावत सुविधा व विनासायास प्रवास आणि मुख्य म्हणजे नवनवीन स्थळांची मागणी येताना दिसते. वंडर हॉलिडेजमध्ये आलेल्या प्रत्येक ग्राहकाची नेमकी गरज संभाषणातुन मिळविली जाते व त्या अनुशंगाने सहलीची ठिकाणे आणि माध्यमे सुचविली जातात. खुपश्या मंडळींना कुठे जायचे हे नेमके सुचत नाही. अश्या वेळेला त्यांना नेमके काय आवडेल हे ओळखण्याची कसब संस्थेच्या कर्मचार्‍यांकडे आहे. त्यासाठी प्रत्येक ग्राहकाशी वैयक्तिक संपर्कच केला जातो.

भारतामध्ये बघण्यासारखे काय आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर थोडक्यात देता येत नाही. अचुक तर नाहीच नाही. कारण हिमालयाच्या उत्तुंग शिखरांपासुन कन्याकुमारीच्या त्रिवेणी समुद्र संगमापर्यंत, राजस्थानच्या वाळवंटापासुन ते अरुणाचलापर्यंत निसर्गाची उधळण आणि भारतीय संस्कृतीची अनुभुती येतच रहाते. काय बघावे? माझ्या बजेटमध्ये काय बसेल? हा विचार करता करता सुट्ट्या संपतात आणि आपण आहोत तिथेच राहतो. अश्या वेळेला सुट्ट्यांआधीच माहितगाराकडे जाउन नियोजन करणेच योग्य असते. हे नियोजन करण्याचे ठिकाण म्हणजे प्रवासी संस्था.

वंडर हॉलिडेज या कामामध्ये तुम्हाला मोलाची मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे.

 

छायाचित्रे
 
© Wonder Holidays. Best viewed in 1024 X 768.