सेवा
आमच्या सहली

वंडर हॉलिडेज पुण्यातील एक नामवंत प्रवासी कंपनी असुन कंपनीतर्फे सहलींचे केले जाणारे नियोजन सर्वांसाठी योग्य होईल असेच वाटते.

    आमच्या प्रवासी सेवांची ठळक वैशिष्टे

सुयोग्य वेळापत्रक व अंमलबजावणी
स्थलदर्शनासाठी उत्कृष्ठ वाहन व्यवस्था
सहली दरम्यान प्रवाशांच्या संरक्षणाची खात्री

आमच्या सहली

वंडर हॉलिडेजच्या संपुर्ण भारतामध्ये ग्रुप टुर्स आयोजित केल्या जातात. प्रवासाची सुरवात भारतातुन कोठुनही करता येते. रेल्वे प्रवासाची, विमान प्रवासाची आरक्षणे आमच्या मार्फत केली जाऊ शकतात.

सहली दरम्यान निवासाची स्टार व डिलक्स हॉटेलची व्यवस्था केली जाते. सर्व हॉटेल्सबरोबर कंपनीचा थेट व्यवहार असतो. प्रवाशांना वास्तव्यादरम्यान कुठलीही असुविधा होणार नाही याची पुरेपुर खात्री केली जाते.

बहुतांशी ग्रुप सहलींमध्ये भोजन व्यवस्था आमच्या अनुभवी किचन स्टाफ कडुनच पुरविली जाते. शुद्ध शाकाहारी भोजन व नाष्टा देण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर असतो. काही ग्रुप सहलींमध्ये हॉटेल्स मधील भोजन दिले जाते. त्यासाठी स्वच्छ, शाकाहारी रेस्टॉरंटची व्यवस्था असते.

सहलींचे नियोजन वेळापत्रकाप्रमाणे केले जाते. सर्व वेळापत्रके आमच्या अनुभवी टुर मॅनेजर्सच्या अनुभवांवर आधारीत असतात. वेळापत्रकांमध्ये प्रवाशांना पुरेसा आराम मिळेल याची काळजी घेतली जाते व त्याचबरोबर सर्व स्थळांना भेटी देता याव्यात, कुठलेही स्थळ बघायचे राहु नये अशी आमची मनापासुन इच्छा असते.

आमच्या व्यवसायाच्या स्वरुपामुळे आम्हाला नेहमीच अतिथी देवाच्या आजुबाजुला रहावे लागते. आमचे यश आम्ही देत असलेल्या सेवा-सुविधा, नम्र कर्मचारी वर्ग आणि व्यवसायावरची निष्ठा यावरच अवलंबुन आहे ही भावना सतत मनाशी बाळगुनच आम्ही कार्यरत आहोत.

आमचा ग्राहक त्याचा वेळ आणि पैसा खर्च करत असतो. तेव्हा त्याला संस्मरणीय सहलानुभव देणे आमचे कर्तव्यच असते. कुशल मनुष्यबळाच्या जोरावर आम्ही हे कर्तव्य तत्परपणे पार पाडतो असे आमचे ग्राहक आवर्जुन सगळ्यांना सांगतात आणि मग अधिक स्फुर्तीने आम्ही काम करतो.

    आमची बलस्थाने

आमची कंपनी नवीन आहे आणि त्यामुळे ती तरुणही आहे. नियोजनात कुठेही नवखेपणा आढळत नाही पण नवनवीन कल्पनांमुळे तरुणपण मात्र नक्की जाणवते.

हे सारे आम्ही साध्य करतो

मागणीप्रमाणे पुरवठा करण्याचे तंत्र
अनुभवी व नम्र कर्मचारी वर्ग
सहलीतील आवश्यक सर्व सुविधांची जय्यत तयारी
सहलींच्या आखणीमध्ये सतत कालानुरुप बदल व नाविन्य देण्याचा प्रयत्न
पारदर्शक कार्यपद्धती
छुपे खर्च नाहीत
ग्राहकांच्या गरजांनुरुप व्यवस्था 

 

छायाचित्रे
 
© Wonder Holidays. Best viewed in 1024 X 768.